हार्दिक पांड्या नताशा स्टॅनकोविक मोहम्मद शमी दिनेश कार्तिक यांच्या आधी घटस्फोट घेतलेले भारतीय क्रिकेटपटू

हार्दिक पांड्या घटस्फोट: अलीकडेच हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांच्या घटस्फोटाच्या बातमीने क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. दोन्ही पक्षांनी अद्याप घटस्फोटाला दुजोरा दिला नसला तरी या घटस्फोटामुळे हार्दिकला त्याच्या संपत्तीतील 70 टक्के हिस्सा नताशाला द्यावा लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. घटस्फोटामुळे चर्चेत असलेला हार्दिक हा एकमेव क्रिकेटर नाही. त्याच्याआधी अनेक क्रिकेटपटूंचे वैवाहिक आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. चला तर मग त्या क्रिकेटर्सवर एक नजर टाकूया ज्यांच्या आयुष्यावर घटस्फोटाचा परिणाम झाला.

शिखर धवन आणि आयेशा मुखर्जी

अनेक वर्षे डेट केल्यानंतर शिखर धवनने 2012 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या आयशा मुखर्जीशी लग्न केले. आयशा आधीच विवाहित होती आणि तिला पहिल्या लग्नापासून दोन मुली आहेत. शिखर आणि आयशा यांना जोरावर नावाचा १० वर्षांचा मुलगा आहे. 2015 पासून धवन आपल्या कुटुंबासह ऑस्ट्रेलियात राहत होता. वास्तविक, जेव्हा दोघांमधील अंतर वाढू लागले तेव्हा धवनने आरोप केला की, आयशा त्यांचा मुलगा जोरावरसोबत अनेक वर्षे ऑस्ट्रेलियात राहत होती आणि भारतात येण्यास नकार देत होती. अखेर ऑक्टोबर 2023 मध्ये न्यायालयाने मानसिक छळाच्या आधारे धवनची घटस्फोटाची याचिका मंजूर केली. वृत्तानुसार, आयशाने धवनवर ऑस्ट्रेलियात खरेदी केलेल्या 3 मालमत्तेची मालकी मिळवण्यासाठी दबावही आणला होता.

दिनेश कार्तिक आणि निकिता वंजारा

दिनेश कार्तिकने 2007 मध्ये त्याची बालपणीची मैत्रिण निकिता वंजारासोबत लग्न केले. निकिताचे आणखी एक क्रिकेटर मुरली विजयसोबत अफेअर असल्याची बातमी समोर आली तेव्हा त्यांच्या लग्नाला फक्त 5 वर्षे झाली होती. यामुळे 2012 मध्ये कार्तिक आणि निकिताचा घटस्फोट झाला. त्यावेळेस पाहिले तर निकिताने केलेल्या विश्वासघाताने कार्तिक खूप निराश झाला होता आणि त्याला भारतीय क्रिकेट संघातूनही वगळण्यात आले होते. निकिता अजूनही मुरली विजयसोबत आहे, दुसरीकडे, दिनेश कार्तिकने ऑगस्ट 2015 मध्ये भारतीय स्क्वॅश खेळाडू दीपिका पल्लीकलशी लग्न केले.

मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ

2018 मध्ये भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीवर त्याची पत्नी हसीन जहाँने गैरवर्तन आणि छळ केल्याचा आरोप केला होता. या आरोपांना उत्तर देताना शमीने सांगितले की, हे सर्व आरोप खोटे असून त्याची प्रतिमा डागाळण्यासाठी हे सर्व केले जात आहे. शमी आणि हसीन 2018 पासून वेगळे राहत आहेत आणि त्यांच्या प्रकरणी कायदेशीर कारवाई अजूनही सुरू आहे. मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ यांना एक मुलगीही आहे. हसीन जहाँने शमीवर मॅच फिक्सिंगचा आरोपही केला होता, पण बीसीसीआयने स्थापन केलेल्या तपास समितीने त्याला क्लीन चिट दिली होती.

Leave a Comment